Jeremiah 16

परमेश्वराने केलेल्या लोकांना न्याय

1परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले, ते म्हणाले. संराष्ट्र आला: 2तू आपणास बायको करून नको घेऊ आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत. 3कारण या ठिकाणी जन्म घेणाऱ्या मुला आणि मुलींना आणि त्यांच्या आयांना ज्यांनी त्यांना जन्म दिला आणि त्यांचे बाप ज्यांमुळे ते या ठिकाणी जन्माला आले, त्यांना परमेश्वर असे म्हणतो, 4“ते रोगग्रस्त मृत्यू मरतील, त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही आणि त्यांना पुरले जाणार नाही. ते शेणखताप्रमाणे जमिनीवर असतील. कारण ते लोक तरवारीने आणि उपासमारीने नष्ट होतील. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व भूमीवरील प्राण्यांस आहार असे होतील.”

5कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ नको जाऊ. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत. असेे परमेश्वर म्हणतो. 6म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.

7मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही. 8ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात त्यांच्यासोबत तू खायला व प्यायला बसू जाऊ नकोस. 9कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, पाहा! तुझ्या डोळ्या देखत मी आनंद आणि उत्सव, नवऱ्याचा आणि नवरीचा शब्द बंद होणार, असे मी करीन.

10आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांना ही वचने सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले? 11तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.

12पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो. 13म्हणून मी तुम्हाला देशाबाहेर काढून तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशात टाकणार, आणि दिवसरात्र तुम्ही तेथे दुसऱ्या देवांची पुजा कराल, कारण मी तुमच्यावर अनुग्रह करणार नाही.

14यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जीवंत आहे. असे लोक अाणखी म्हणणार नाही. 15ज्याने इस्राएलाच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली आणि त्या देशात जीथे त्याने त्यांना पांगवले, त्यातूनही काढून वर अाणले तो परमेश्वर जीवंत आहे. असे ते म्हणतील आणि त्यांचा जो राष्ट्र मी त्याच्या पूर्वजांना दिला होता त्यामध्ये मी त्यांना परत आणीन.

16परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांना मासे धरल्या पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील. 17कारण माझे डोळे त्यांच्या मर्गावर आहेत, ते माझ्यासमोरुन लपलेले नाहीत. त्यांचे अन्याय माझ्या डोळ्यांपासून लपलेला नाही. 18मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.


19परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षीत स्थान तू आहेस.

पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे.
जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.”
20लोक स्वत:साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच.
यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन,
म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.”
21

Copyright information for MarULB